Increase in onion market price: अरे वा …..शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. यावर्षी कांद्याला मिळणार 6000 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव, जाणून घ्या यामागील कारण

Increase in onion market price

Increase in onion market price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही आज या बातम्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. मागील एक महिन्यापूर्वी कांद्याचे भाव खूपच कमी होते. मात्र आता पुन्हा कांद्याचे भाव वाढू लागले आहेत यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

वर्षाच्या सुरुवातीलाच कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले होते. म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्या दरम्यान कांद्याला फक्त 2 ते 3 रुपये प्रति किलो भाव मिळत होता. हा भाव अत्यंत कमी असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारकडून अनुदान मिळावे यासाठी विनंती केली. यानंतर सरकारने कांद्यावर अनुदान देखील जाहीर केले यामुळे शेतकऱ्यांची काहीशी नाराजी बाजूला झाली.

सरकारकडून कांदा उत्पादन शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये एवढे अनुदान देण्यात आले होते. हे अनुदान ज्या शेतकऱ्यांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांदा विक्री केला आहे फक्त याच शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जात होते.Increase in onion market price

कांद्याचे भाव वाढावेत यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारकडून कांदा निर्यात करण्यासाठी 40 टक्के शुल्क आकारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर याचा परिणाम म्हणून आता बाजारात पुन्हा कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. काल अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एपीएमसीमध्ये 5 हजार रुपये एवढा भाव मिळाला होता. त्याचबरोबर सरासरी बाजार भाव देखील 3000 हजार रुपयांच्या पुढे असल्याचे समोर येत आहे.

त्याचबरोबर सध्या मागील उन्हाळी हंगामातील कांदा संपत आलेला आहे. यामुळे बाजार समितीमध्ये आवक देखील कमी कमी प्रमाणात होत आहे. आणि विशेष म्हणजे सध्या नवरात्र आणि पुढील महिन्यात दिवाळी असल्यामुळे कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

यामुळे तज्ञांच्या मध्ये आगामी काळात कांद्याचे भाव 6 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहू शकतात. हा अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी खूपच गोड होईल.Increase in onion market price

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *