Kanda chal Anudan Yojna 2023: अरे वा… कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरू आताच आपला अर्ज करा

Kanda chal Anudan Yojna

Kanda chal Anudan Yojna 2023: नमस्कार शेतकरी मित्रानो स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉग मध्ये आज आपण कांदा चाळ अनुदान योजना 2022 बद्दल जाणून घेणार आहोत. या योजेअंतर्गत तुम्हाला कांदा साठवण साठी अनुदान दिले जाणार आहे.

जर आपण सुद्धा एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती आनंदाची बातमी म्हणजे कांदा चाळ अनुदान योजना होय. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी कोणते कागटपत्र लागतात आणि अर्ज कुठे करावा याबद्दल सगळी माहिती आपण देणार आहोत.

या योजनेचा ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा पाहण्यासाठी क्लिक करा

सगळ्या शेतकऱ्यांसाठी सरकार दर वेळेस नवीन नवीन योजना अमलात आणते. या योजनांचा लाभ सर्व शेतकरी लोकांना मिळवा म्हणून आम्ही ही पोस्ट लिहीत आहे.

जसे की तुम्हां सगळ्यांना माहिती असेल की कांदा हे एक नासाड पीक आहे. जसे एक कांदा सडला तर तो दहा कांद्याना सडवतो. त्यामुळे कांद्याचे व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.जर आपण कांद्याला चाळ मध्ये ठेवले तर त्याची सड कमी होते व त्याकडे शेतकऱ्याला जास्त लक्ष द्यावे लागत नाही. परंतु कांदा चाळ उभारण्यासाठी शेतकऱ्याला भरपूर पैसे लागतात.

त्यासाठीच सरकारने कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली आहे. या योजेअंतर्गत सरकार कांदा चाळ उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के अनुदान देणार आहे. यामध्ये एका शेतकऱ्याला पंचवीस मे दोन कमाल मर्यादा अनुदान दिले जाते.Kanda chal Anudan Yojna 2023

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे

 • 7/12 वर कांदा पीक नोंदणी असणे आवश्यक आहे
 • नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था
 • शेतकऱ्यांचा गट
 • शेतकऱ्याचा सहकारी संस्था
 • शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
 • शेतकऱ्याकडे साठवणूक केलेले असणे आवश्यक आहे.

कांदा चाळ अनुदान आवश्यक कागतपत्रे खालीलप्रमाणे..

 • आधार कार्ड
 • जातीचे प्रमाणपत्र
 • आधार कार्ड लिंक असलेल्या बँक पासबुक ची झेरॉक्स
 • यापूर्वी कोणत्याही कांदा चाळ योजनेचा लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र

या योजनेचा ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा पाहण्यासाठी क्लिक करा

कांदा चाळ योजनेचे अनुदान किती? (Kanda Chal Anudan Yojana)

मित्रांनो कांदा चाल अनुदान हे ५, १०, १५, २५, ५० मेट्रिक टन पर्यंत दिले जाते. कांदा चाल बांधण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान देण्यात येते. जर तुमचा कांदा हा २५ मेट्रिक टन असेल तर तुम्हाला ८७ हजार पर्यंत अनुदान मिळू शकते.

कांदा चाळ अनुदान योजना लाभार्थी पात्रता

तुमच्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जर खाली दिलेले पॉइंट्स असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

 • स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
 • आपल्या शेतीच्या सातबाऱ्यावर कांदा पीक उत्पन्न नोंद असायला हवी.
 • जर तुम्ही दरवर्षी कांदा पीक घेत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
 • वैयक्तिक शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
 • कांदा उत्पादक शेतकऱ्याला लवकर लाभ मिळतो
 • शेतकऱ्यांचा गट असणे आवश्यक आहे.
 • स्वयसहायाता गट आवश्यक आहे
 • शेतकरी महिला गट
 • शेतकऱ्यांचा उत्पादन संघ
 • शेतकऱ्यांची सहकारी संस्था

या योजनेचा ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा पाहण्यासाठी क्लिक करा

कांदा चाळ अनुदान योजना

कांदा अनुदान योजना जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला महाडीबिटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल . आता हा अर्ज तुम्हाला कसा करायचा या साठी आम्ही तुम्हाला खाली लिंक दिली आहे. या लिंक मध्ये तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ देण्यात येणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला कांदा चाल हवी असेल तर तुम्ही एक कांदा उत्पादक शेतकरी असायला हवे. तसेच दरवर्षी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पन्न व्हायला पाहिजे. तुमचा जी सातबारा आहे त्यावर कांदा पिकाची नोंद असायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *