Reshim Sheti Details in Marathi रेशीम शेती बद्दल संपूर्ण माहिती

Reshim Sheti Details in Marathi रेशीम शेती बद्दल संपूर्ण माहिती

रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी एक पूरक व्यवसाय आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना एकदम कमी मेहनत करून चांगले उत्पादन मिळू शकते. तसेच हा व्यवसाय तुम्ही छोट्या जागेतून सुद्धा करू शकता.

रेशीम शेती मध्ये जास्त खर्च नाही आहे. तसेच यामध्ये रेशीम किड्यांचे संगोपन करून त्यांच्या पासून रेशीम तयार करण्यात येते. या शेतीतून चांगला नफा सुद्धा मिळतो तर चला जाणून घेऊया रेशीम शेतीबद्दल संपूर्ण माहिती.

🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

रेशीम शेतीला बाजारामध्ये मागणी आहे का

जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहे. तर रेशीम शेती ला सुद्धा खूप जास्त मागणी आहे कारण या पासून धागा निर्मित केला जातो आणि त्या धाग्यांपासून कपड्याची निर्मिती होते. हा ग्रामीण भागातील लोकांसाठी एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. बऱ्याच टेक्सटाइल कंपन्या या मोठ्या प्रमाणात रेशीम धाग्याची आयात करतात व नंतर त्या पासून कपडे निर्माण करतात. तसेच रेशीम कपड्याची बाजारात अती जास्त मागणी आहे.

या धाग्याची मागणी ही दरवर्षी 16-17 टक्क्यांनी वाढत आहे. या शेतीमुळे खूप जणांना फायदा झाला आहे तसेच महाराष्ट्र मध्ये एका एकरात तुती लागवड द्वारे लक्षाधीश झालेल्या शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आहे.

🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

रेशीम शेतीचे प्रकार

रेशीम शेतीचे मुख्य 6 प्रकार आहेत.

  1. एरी या अरंडी रेशीम
  2. मूंगा रेशीम
  3. गैर शहतूती रेशीम
  4. तसर (कोसा) रेशीम
  5. ओक तसर रेशीम
  6. शहतूती रेशीम
🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

रेशीम उद्योगात आवश्यक साहित्य

  1. ट्रायपॉड्स (हे लाकडाचे किंवा बांबूचे बनलेले असते)
  2. जाळी – (लहान कापडी जाळी, ज्यातून उरलेली पाने आणि कीटकांची विष्ठा साफ केली जाते)
  3. पाने कापण्यासाठी चाकू आवश्यक आहे.
  4. हायग्रोमीटर आवश्यक.
  5. कुलर

तुतीची लागवड पद्धत तुती लागवड माहिती

तुती ही एक रानटी वनस्पती आहे. तिचा पानाचा आकार मोठा असून पुढे अरुंद आहे. तुती हे रेशीम किटकाचे खाद्य आहे.

  • तुती लागवडीला कसदार जमीन लागते. तुती लागवड करताना दोन सरीचा मधील अंतर 4 ते 5 फूट ठेवावे आणि ओळीमधील दोन झाडांमध्ये 3 फुटांचे अंतर ठेवावे म्हणजे तुती पोसेल तिची वाढ उत्तम प्रकारे होईल.
  • तुती ही रानाटी वनस्पती असल्याने तिला पाणी कमी लागते एक एकर उसाला जेवढे पाणी लागते तेवढ्या पाण्यात तीन एकर तुती तुम्ही आरामात जगवू शकता.
  • पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन किंवा पारंपारिक पाटाने पाणी देऊ शकता.
  • तुती लागवडी पासून 45 दिवसात तुती कापणीला येऊन आडिच ते तीन महिन्यात तुम्ही उत्पन्न मिळऊ शकता.
  • एकदा लावलेली तुती तुम्ही 15 वर्षांपर्यंत आरामात जगवू शकता तुम्हाला पुन्हा तुती लावण्याची गरज नाही.
  • एका एकरमध्ये तुम्ही 200 किलो रेशीम उत्पादन मिळऊ शकता.
🔥 Whatsapp Group👉 येथे क्लिक करा
🔥 Telegram Group👉 येथे क्लिक करा

रेशीम शेतीसाठी शेड कशाप्रकारचे असावे ? Reshim Udyog Shed

  • शेडचा आकार 65 फूट लांब आणि 34 रुंद एक एकर तुतीसाठी.
  • रेशीम शेतीसाठी शेडची गरज लागते, शेड बांधण्यासाठी शासन अनुदान ही देते.
  • शेड बांधताना ते स्वच्छ करण्यास सोपे राहील अशा पद्धतीने शेड बांधा.
  • अळ्यांना वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी स्वच्छतेला खूप महत्व आहे.
  • आळी शेडमध्ये आनण्यापूर्वी ते रेशीम कोश विकल्यानंतर संपर्ण शेड तसेच आळी ठेवण्यासाठी केलेले रँक लोखंडी असो किंवा बांबूचे निर्जंतुक करून घ्या.
  • शेड अशा पद्धतीने बांधा जेणेकरून तिथे इतर प्राणी किंवा कीटकांना शिरकाव करता येणार नाही म्हणजे ते आळीला खाणार नाहीत.
  • मुंग्यापासून संरक्षणासाठी साधा उपाय म्हणजे रँकचे पाय वाटी, प्लेट मध्ये ठेवून त्यात पाणी ओतावे जेणेकरून मुंग्या वर चढणार नाहीत.
  • शेडचा आसपासचा परिसर स्वच्छ असावा जेणेकरून तेथून रोगजंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही.
  • चंद्रिका जाळी जिच्यावर आळी सोडली जाते ती देखील सुरवातीला आणि शेवटी निर्जंतुक करून घ्यवी.
  • शेडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता पाळावी त्यांचा हातांद्वारे देखील रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

रेशीम (शेती) उद्योगासाठी सरकार द्वारा देण्यात येत आहे 75 टक्के अनुदान जाणून घ्या पूर्ण माहिती

रेशीम शेतीला वाढवा देण्यासाठी सरकार द्वारा नवीन नविण्योजना राबिण्याबाबत येत आहेत. कारण या मुळे शेतकऱ्यांना ही शेती करण्यासाठी थोडा कमी खर्च यायला हवा असा सरकारचा निर्णय आहे

या साठी सरकार द्वारा 2 मुख्य योजना राबविण्यात येत आहे ज्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेद्वारे शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. तर केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या सिल्क समग्र या माध्यमातुन अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

अनुदान किती आहे?

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी या योजने अंतर्गत 1 एकरसाठी तुती लागवड जोपासना तसेच साहित्य खरेदी यामध्ये रोपे, खते, औषधी यासाठी एकूण 2 लाख 176 रुपये इतके अनुदान 3 वर्षात विभागून दिले जाते. तसेच किटक संगोपन गृह बांधकामासाठी एका वर्षात 92 हजार 289 रुपये अनुदान देण्यात येते.

या योजनेत लाभ घेण्यासाठी मात्र, लाभार्थी यांचेकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. तर केंद्रच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या सिल्क समग्र ही योजना ज्यांच्यासाठीच आहे जे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सहभाग घेऊ शकले नाहीत. सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी जॅाबकार्ड असेल तर एकूण खर्चाच्या 75 टक्के अनुदान हे तीन वर्षात मिळते. तर अनुसूचित जाती-जमातीमधील लाभार्थ्यांसाठी 90 टक्के अनुदान 3 वर्षात मिळते. किमान 1 एक्करमध्ये तुतीची लागवड ही बंधनकारक राहणार आहे.

अनुदानासाठी असा करा अर्ज

सर्व प्रथम रेशीम संचालनालयाची www.mahasilk.maharashtra.gov.in या वेबसाईट वर साईन अप मध्ये New user वर क्लिक करून I Agree केल्यानंतर Stake Holder मध्ये – Farmer – Mulberry/Tasar वर क्लीक करावे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व माहिती भरून शेवटी स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड व बँक पास बुक ची फोटो कॉपी Upload करावी. शेवटी Submit केल्यानंतर शेतकऱ्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्याचे कॉम्पुटर च्या screen वर sms येईल. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास जाऊन 7/12, 8 अ, बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जॉब कार्ड हे नोंदणी शुल्कासह देऊन नोंदणी पूर्ण करावी.

अनुदानाचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *