Weather News Live: ‘या’ तारखेपासून पाऊस पुन्हा मुसळधार बरसणार, भारतीय हवामान विभागाची मोठी घोषणा

Weather News Live

IMD Live Today : नैऋत्य मान्सूनसंदर्भात भारतीय हवामान विभागानं मोठी घोषणा केली आहे. 25 सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे.

सध्या देशातील काही राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. मात्र, काही भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. अद्यापही शेती पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीतच परतीच्या मान्सून अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Also Read

राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

राज्याच्या बहुतांश भागात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सध्या राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

23 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 24 ते 26 सप्टेंबर(रविवार ते मंगळवार) दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर उर्वरित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *